प्रेमभावसमायुक्तं स्मरणात् मोक्षदायकम्।
नमामि भगवत्पादं, सद्गुरुदासविग्रहम्।।१।।
जे प्रेमभावाने युक्त आणि स्मरणाने मोक्ष देणारे आहेत,
त्या भगवत्पाद सद्गुरुदास महाराजांना मी नमस्कार करतो.
यस्य चरणतीर्थेण पापं तापं विमुच्यते।
वंदे भागीरथीरूपं, सद्गुरुदासविग्रहम्।।२।।
ज्यांच्या चरणतीर्थाने पाप आणि ताप दूर होतो,
त्या भागीरथीच्या रूपात असलेल्या सद्गुरुदास महाराजांना मी नमस्कार करतो.
स्मर्तृगामी महाज्ञानी दयाशांतिगुणै: गुरु:।
भूषयेत् हृदये वन्दे सद्गुरुदासविग्रहम्।।३।।
स्मरण करताच धावून जाणारे, महाज्ञानी, दया-शांतिगुणांनी परिपूर्ण असलेले , माझ्या हृदयाला भूषविणाऱ्या सद्गुरुदास महाराजांना मी नमस्कार करतो.
विष्णुदासः कृपां नित्यं वर्षति करुणामयीम्।
व्रतस्थजीवनं वन्दे सद्गुरुदासविग्रहम्।।४।।
विष्णुदास महाराजांची करुणामय कृपा ज्यांच्यावर नित्य वर्षते, त्या
व्रतस्थ जीवन असलेल्या सद्गुरुदास महाराजांना मी नमस्कार करतो.
भक्तानामापदं व्याधिं स्मरणेन विनश्यति।
नमामि शक्तिसम्पन्नं सद्गुरुदासविग्रहम्।।५।।
भक्तांची संकटे आणि व्याधी ज्यांच्या स्मरणाने नष्ट होतात त्या शक्तिसंपन्न असलेल्या सद्गुरुदास महाराजांना मी नमस्कार करतो.
सरलो दर्शितो मार्ग उपासना प्रदक्षिणा।
धन्योsनुग्रहं लब्ध्वा सद्गुरुदासविग्रहम्।।६।।
उपासना आणि प्रदक्षिणा हे सरल मार्ग शिकविणाऱ्या,
ज्यांचा अनुग्रह प्राप्त होऊन मी धन्य झालो, त्या सद्गुरुदास महाराजांना मी नमस्कार करतो.
धर्मभास्कर रूपेण प्रकाशयति सत्पथा:।
सद्गुणग्राहकं वन्दे सद्गुरुदासविग्रहम्।।७।।
धर्माचा प्रकाशक असलेल्या रूपात सत्य मार्ग दाखवणारे,
सद्गुणग्राहक अश्या सद्गुरुदास महाराजांना मी नमस्कार करतो.
इदं स्तोत्रं पठेन्नित्यं श्रद्धाभक्तिसमन्वितम्।
प्राप्नुयात् तत्कृपां वन्दे सद्गुरुदासविग्रहम्।।८।।
श्रद्धा आणि भक्तीने युक्त होऊन हे स्तोत्र प्रतिदिन वाचावे आणि
ज्यांच्या कृपेला प्राप्त व्हावे, अश्या सद्गुरुदास महाराजांना मी नमस्कार करतो.
||श्री गुरुदेव दत्त||
रचनाकार: श्री शशांक देशपांडे, पुणे