पत्रभेट ईमेल

info@patrabhet.in

कार्यालय संपर्क

श्री मंगेश बरबडे - ९९२१२ ३७९९९

घराघरात संस्कार रुजविणारी आध्यात्मिक मासिक पत्रिका

धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार |

जाले आहेत पुढे होणार | देणे ईश्वराचे ||

|| दासबोध १८.६.२० ||

घराघरात संस्कार रुजविणारी आध्यात्मिक मासिक पत्रिका

गुरु तेथ ज्ञान | ज्ञानी आत्मदर्शन |

दर्शनी समाधान | आथी जैसें ||

ज्ञानेश्वरी, ओवी क्र.१८-१६३७

पत्रभेट एक सेवाकार्य

अध्यात्मात सद्‌गुरुचे स्थान हे निर्विवाद सर्वोच्च आहे…! कुठलाही पंथ असो, धर्म असो त्या प्रत्येकात सदगुरुंची महती परमश्रद्धेने संतांनी गायली आहे. सदगुरुंचे खरे स्वरुप “ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं” असेच आहे. संत,सदगुरु आपले वाटाडे असतात, ते आपल्याला खर्‍या सुखाचा मार्ग दाखवितात. आपल्या सहज बोलण्यातून ते सोप्या शब्दात वेदांत सांगतात॰ ऐसी कळवळ्याची जाती | लाभाविण करी प्रीति || ” तर अशा या परंज्योती परम सदगुरुंचे वाङमयीन रुप असलेली पत्रभेट मासिक पत्रिका दर महिन्याला आपल्याला सदगुरुंची भेट घडविते.

सगुणातील सदगुरुंचे ज्ञानमय स्वरुप म्हणजे त्यांचे विचारधन, त्यांचे वाङमयीन रूप…! प.पू. विष्णुदासस्वामी महाराज म्हणतात व्यक्ति अमर नसते, तर विचार अमर असतात ‘पत्रभेट’ आपल्याला सदगुरुंच्या ह्याच स्वरूपाची ओळख घडविते. पत्रभेट हे केवळ एक मासिक नसून जणू श्रीगुरुचरित्रच आहे. आपल्या श्रीगुरुंचे चरित्र, विचार, ज्ञानामृत ज्यात असते ते गुरुचरित्रच… !

'पत्रभेट'ची वैशिष्ट्ये - काही निवडक विशेषांक

स्मर्तृगामी- सद्गुरुदास महाराज स्मरण विशेषांक

विशेषांक
  • बाजारात अनेक धार्मिक मासिके बघायला मिळतात, परंतु पत्रभेटचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या ७ वर्षांपासून सतत विशेषांकाचे प्रकाशन होते आहे. किंबहुना विविधरंगी आकर्षक विशेषांक ही पत्रभेटीची ओळख आहे.
  • विशेषांक असला म्हणजे तो नेहमीच हवाहवासा वाटतो. अभ्यास करण्यासाठी एखाद्या विषयाची माहिती लागते त्यावेळी तो निवडक विशेषांक काढून त्याची सखोल माहिती अभ्यासार्थींना मिळू शकते. उदा. व्रतवैकल्य विशेषांक, विज्ञान व अध्यात्म विशेषांक, गुरुमहात्म्य विशेषांक, शिवशक्ती विशेषांक, सप्तनद्या विशेषांक, चातुर्मास विशेषांक, स्तोत्र व प्रार्थना विशेषांक इत्यादि
  • आजपावेतो ७५ च्या वर विशेषांक ‘पत्रभेटने’ वाचकांना दिले आहेत.

मुखपृष्ठ – पत्रभेटचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे तिचे विविधरंगी आकर्षक व समर्पक मुखपृष्ठ.. !

e-पत्रभेटसध्याचा काळ हा Digital आहे. आपले काही वाचक हे परदेशातही असल्यामुळे त्यांच्यासाठी e -पत्रभेट ही सुविधा आहे. आपल्या Computer किंवा Mobile वर संपूर्ण अंक वाचायला मिळतो.

घरपोच वितरण – दर महिन्याला पत्रभेट आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर पोस्टाने घरपोच मिळते

सभासद – अशा या गुरुकृपांकित असलेल्या पत्रभेटचे अनेक संत तसेच नामवंत आदरणीय लोक सभासद आहेत

WordPress Warehouse ElemForm7 PRO – Advanced Elementor Widget for Contact Form 7 EXA Navigator – Fullscreen Menu for Elementor Gravity Forms Autocomplete (+address field) Interactive World Map for Elementor – Mapper Masking Video addon for Elementor Pmotion – Animated GIF and Video Maker For WordPress Spectrum Audio Player WordPress & WooCommerce Plugin Stunning 3D Off Canvas Menu WordPress Plugin – 3D Menu Awesome Ultimate Bundle Two for WPBakery Page Builder (formerly Visual Composer) WooCommerce for LatePoint (Payments Addon)