पत्रभेट ईमेल

info@patrabhet.in

कार्यालय संपर्क

श्री मंगेश बरबडे - ९९२१२ ३७९९९

पॉडकास्ट

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

|| सद्गुरुनाथ महाराज की जय ||

|| जगदंबा माता की जय ||

प. पू. विष्णुदास स्वामी महाराजांच्या कृपेने , प.पू. सद्गुरुदास स्वामी महाराजांच्या प्रेरणेने व प.पू. सौ. आक्काईच्या आशीर्वादाने आपण पत्रभेटच्या "गुरुप्रबोध नवनीत" या Podcast रुपी एका नवीन उपक्रमास सुरुवात केली आहे.

“गुरुप्रबोध नवनीत” या उपक्रमा विषयी थोडेसे –

माध्यम तंत्रज्ञानातील अलिकडच्या काळातील मोठा आविष्कार म्हणजे पॉडकास्ट. प. पू. सदगुरुदास महाराजांच्या  “आस्था वहीं व्यवस्था नई “ या आज्ञेनुसार आपण हा उपक्रम राबविणार आहोत. 

“गुरुप्रबोध नवनीत “ या पॉडकास्टमालेच्या माध्यमातून दर गुरुवारी आपल्याला प. पू. सद्गुरुदास स्वामी महाराजांचे अमूल्य विचारधन श्रवण करता येणार आहे. त्यांची प्रवचने, कीर्तने, सहज बोलण्यातून केलेला हितोपदेश, पत्रभेटमध्ये आलेले त्यांचे मार्गदर्शन आपल्याला या माध्यमातून ऐकता येईल तसेच त्यायोगे त्यांच्या कायम अनुसंधानात आपण असणार आहोत.

पॉडकास्टचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मोबाइल वर ऐकण्यासाठी तुम्हाला हातातले काम बाजूला ठेवायची गरज नाही. आपली नित्य उपासना झाल्यावर, घरी काम करीत असताना, गाडी चालवित असताना केव्हाही आणि कुठेही तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता.त्यामुळेच, हे माध्यम सर्व लोकांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होते आहे.

“गुरुप्रबोध नवनीत” ही आपली पॉडकास्टमाला जगभरातील नामांकित चॅनल्सवरुन प्रसारित होणार आहे. उदाहरणार्थ, एपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, स्पॉटिफाय, जीओ सावन, ऑडिओबुम, एमेझॉन म्युझिक, स्टोरीटेल इत्यादी. तसेच आपल्याला प्रत्येक भागाची  Link आपल्या WhatsApp वर पण मिळेल. त्यावर आपल्याला पॉडकास्टचा प्रत्येक भाग ऐकता येईल.

पत्रभेट प्रस्तुत “गुरुप्रबोध नवनीत” ही पॉडकास्टमालिका दिलेल्या link वर आपल्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहील. त्यामुळे वारंवार व कधीही आपण याचे श्रवण करु शकतो.

आपण Podcast ची link आपल्या उपासना केंद्रांमध्ये तसेच संपर्कातील सर्व समविचारी Groups मध्ये पाठवावी जेणेकरुन प.पू. बाबांचे व प.पू. सदगुरुदास स्वामी महाराजांचे अमूल्य विचारधन सर्वदूर पोहचेल.

जय श्री विष्णुदास
जय श्री सदगुरुदास

सौ. वर्षा वेलंकीवार (उपक्रम प्रमुख) आणि पत्रभेट Podcast टीम

पॉडकास्ट ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा